Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रांताधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन; भाजप पदाधिकार्‍यांनी सोडले उपोषण

बोदवड प्रतिनिधी | प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर येथे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सोडले आहे.

बोदवड शहरातील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी भाजपने मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यानंतर काल सायंकाळी भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत, बोदवड शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करण्यात येईल. काही नैसर्गिक आपत्ती व तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य न झाल्यास पालिकेमार्फत टँकरने प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था, दररोजचे उद्भवणारे दुरुस्तीचे कामकाज तत्काळ करणेबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांनी मान्य केले आहे. ओझरखेडा धरणातील तात्पुरत्या स्वरूपातील पाणीपुरवठा योजना एक वर्षात कार्यान्वित करणे व बोदवड शहरासाठी स्वतंत्र पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले. यानंतरच भाजपच्या पदाधिकार्‍यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली.
प्रभागात पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था, दररोजचे उद्भवणारे दुरुस्तीचे कामकाज तत्काळ करणेबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांनी मान्य केले आहे.

दरम्यान, प्रांताधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने भाजप पदाधिकार्‍यांनी आपले उपोषण सोडले. दरम्यान, उपोषण सोडतांना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांची देखील उपस्थिती होती.

Exit mobile version