Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भानखेडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुलगी घरात झोपलेली असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

अखेर पिडीत मुलीच्या वडीलांना बोदवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन चौधरी करीत आहे.

Exit mobile version