Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्लू काईट फेस्टीवल विद्यार्थी, महिलांसाठी उत्तम व्यासपीठ : डॉ.अस्मिता पाटील

jalgaon festival news

जळगाव, प्रतिनिधी । बचतगट, लघुउद्योग चालविणाऱ्या महिलांसाठी एखादा मेळावा आयोजित करणे, शॉपींग फेस्टीवल घेणे ही त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यातच अशा आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारीत फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने त्यांना देखील एक व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत बेटी बचाव, बेटी पढावच्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनी केले.

शहरातील लेवा बोर्डिंग हॉलमध्ये सम्यक जैन महिला मंडळ आयोजित ब्लू काईट शॉपींग फेस्टीवलच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. चार दिवसीय या फेस्टीवलच्या उदघाटनप्रसंगी दलूभाऊ जैन, नयनतारा बाफना, डॉ.सोनाली जैन, डॉ.श्रद्धा चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.अस्मिता पाटील पुढे म्हणाल्या की, महिलांसाठी एखादा आगळावेगळा महोत्सव आयोजित करणे हा खूप चांगला उपक्रम आहे. अशा उपक्रमाने बेटी बचाव बेटी पढावला देखील चालना मिळते. महिलांना बाजारपेठेचा प्रत्यक्ष अनुभव येतो, असे त्यांनी सांगितले. संघपती दलूभाऊ जैन यांनी सांगितले की, बचतगट मेळावा किंवा महोत्सवात महिलांना खूप काही शिकायला मिळते. विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग असल्याने त्यांच्या देखील विचारांना आणि कलागुणांना याठिकाणी वाव मिळेल, असे दलूभाऊ जैन म्हणाले.

कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना सम्यक जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला टाटीया यांनी ब्लू काईट फेस्टीवलचा उद्देश विषद केला. तसेच महिला मंडळमार्फत वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी साक्षी वाणी हिने मनोगत व्यक्त केले. उपक्रमासाठी सम्यक जैन महिला मंडळाच्या सर्व सदस्य परिश्रम घेत आहे.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्लू काईट फेस्टीवलचे आयोजन एक आगळावेगळा उद्देश ठेवून करण्यात आले आहे. एमबीएचे विद्यार्थी स्वतः माहिती देत असल्याने ग्राहकांना देखील हा एक वेगळा अनुभव आहे. मोजके आणि निवडक उत्पादनांचे स्टॉल असल्याने जळगावकर नागरिकांच्या ते पसंतीस उतरले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version