Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवासेनेतर्फे रक्तदान शिबिरात ५५ जणांचे रक्तदान

जळगाव प्रतिनिधी ।  येथील युवासेना महानगरतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व युवासेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कुणाल दराडे व किशोर भोंसले यांचे आदेशानुसार आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता रकपिशव्या कमी पडत आहे, त्यामुळे रक्तदानाची आवश्यकता आहे, असे राज्य सरकारने सांगितले होते. या संकट समयी रक्ताच्या अभावी कोणाला प्राण गमवावे लागू नये म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसाययटीचे पदाधिकारी डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, युवासेना ज़िल्हा युवाअधिकारी शिवराज पाटील, उपजिल्हा युवा अधिकारी पियूष संजयकुमार गांधी, ज़िल्हा युवा सरचिटणीस राहुल पोतदार,  ग्रामीण युवा अधिकारी सचिन चौधरी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी,  युवती अधिकारी यशश्री वाघ, विद्यापीठ अधिकारी अंकित कासार, यांच्यासह तेजस दुसाने, जय मेहता, ललित अमोदकर, रोहित शिरसाठ, मनोज  पोकळे, महेश ठाकुर आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version