Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ युवकांचे रक्तदान

 

शेंदूर्णी प्रतिनिधी । जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य  संजय गरुड यांचा ६१ वा वाढदिवस रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्यात आला.  सुरवातीला माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून नारळ वाढविण्यात आले.

 

रक्तदान शिबिराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रामानंद ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते योगेश देसले व जळगाव रेडक्रॉस सोसायटी व पाचोरा येथील रेडप्लस सोसायटीच्या डॉक्टर उपस्थित होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते संजय गरुड यांचे शाल व पुष्प बुके देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.वाकोदचे राष्ट्रवादी नेते जय पांढरे, जामनेर शहराध्यक्ष जितेश पाटील,  नाचनखेडा येथील शोएब पटेल, डॉ.बाजीराव पाटील, गोंदेगाव सरपंच देवानंद शिंदे यांनीही संजय गरुड यांचे  पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. या रक्तदान शिबिरात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी शेंदूर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम , डॉ. शुभम साळवे व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात पाचोरा येथिल विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड यांनी हजेरी लावली. प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच सागरमल जैन,  शांताराम गुजर, माजी पं. स.सदस्य सुधाकर बारी, डॉ. किरण सूर्यवंशी, शेंदूर्णी जिनिंग प्रेसिंग व्हाईस चेअरमन नंदकिशोर बारी, संचालक राजेंद्र पवार, शेंदूर्णी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीराम काटे, स्थानिक कार्यकर्ते गजानन धनगर, आनंदा धनगर, योगेश गुजर, फारुख खाटीक, रवी गुजर, प्राचार्य व्ही. आर. पाटील, उप प्राचार्य श्याम साळुंखे, आर.जी.पाटील सर पतसंस्था व्यवस्थापक विनोद चौधरी, लिपिक निलेश चौधरी, संजू सपकाळ, मोहन फासे, पंकज जैन, विनोद तडवी उपस्थित होते,सूत्रसंचालन प्रा. दिनेश पाटील, प्रा. महेश पाटील यांनी केले. यावेळी जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, प्रल्हाद बोरसे, दीपक महाराज, सामाजिक न्याय विभागचे संदीप हिवाळे, जामनेर जीन प्रेसचे वाईस चेअरमन पुंडलिक पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विनोद माळी, माधव चव्हाण, यांनी मा. संजय गरुड यांचे अभिष्टचिंतन केले.

 

Exit mobile version