Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिंचोली येथे टायगर गृपतर्फे रक्तदान शिबीर

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथे श्रीराम नवमी निमित्ताने टायगर गृप, ग्रामपंचायत आणि रेडप्लस ब्लड बँकेच्या वतीने आज बुधवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबीरात १५ जणांनी रक्तदान केले.

कोरोना काळात रूग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे अशा आपत्तीच्या काळात  गरज व सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून टायगर गृप, चिंचोली ग्रामपंचायत आणि डप्लस ब्लड बँकेच्या वतीने चिंचोली येथे श्रीराम जयंतीनिमित्त आज २१ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी सरपंच शरद घुगे, ग्रा.पं.सदस्य किरण घुगे, सुनील लाड, आनंद घुगे, सुभाष पवार, मनोज घुगे, जितेंद्र पोळ, विशाल पालवे, आयोजक टायगर गृपचे गौरव उमप, किरण घुगे, सोपान मानकर, सचिन धुमाळ, गणेश ढाकणे, रूपेश घुगे, रविंद्र पाटील, अजय शिरसाठ यांच्यासह मित्रपरिवार यांची उपस्थिती होती. अयोजित रक्तदान शिबीरात एकुण १५ जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी रेडप्लस ब्लड बँकेचे डॉ भरत गायकवाड, विवेक महाजन आणि प्रकाश सपकाळ यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version