Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे रक्तदान शिबीर उत्साहात

पारोळा प्रतिनिधी । मुखमंत्री उद्धव ठाकरे  आवाहनानुसार आज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानामुळे कोरोना आटोक्यात येत असली तरी सध्या राज्यभरात रक्तपुरवठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतुन व सन्मा. पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार युवासेना मार्फत महाराष्ट्रराज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तातडीने पुन्हा एकदा ‘महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन होत आहेत.

या आव्हानाचे पालन करुन  तसेच युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य  कुणाल दराडे, किशोर भोसले, आमदार चिमणराव पाटील व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. १३ रोजी जीवन ज्योती ब्लड सेंटर, धुळे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन पारोळा कृषि उत्पन्न समितीत करण्यात आले.

यावेळी तब्बल ७१ दात्यांनी रक्तदान केले असुन सर्व दात्यांचा  आमदार चिमणराव पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील व युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, पारोळा युवासेना शहरप्रमुख आबा महाजन,  डाॕ.दिनकर पाटील, दिनकरआबा पाटील, बाजार समितीचे उपसभापती दगडु पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर, डाॕ.पी.के.पाटील, देवगांव उपसरपंच समिर पाटील, शेतकी संघ मा.व्हा.चेअरमन जिजाबराव पाटील, शेतकी संघ मा.चेअरमन डाॕ.राजेंद्र पाटील, मा.व्हा.चेअरमन भिकन महाजन, व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक प्रा.चेतन पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, एरंडोल नगरसेवक अतुल महाजन, मा.नगरसेवक राजेंद्र कासार, प्रा.मृणालताई पाटील, तालुका महिला संघटन उर्मिला भोसले, शहर संघटिका गायत्री महाजन, सिमाताई पाटील, मा.शहरप्रमुख बापु मिस्तरी, म्हसवे सरपंच सतिष संदानशिव, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, दादा पाटील, पारोळा शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई, युवासेना उपशहरप्रमुख सावन शिंपी, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, सुशिल पाटील, पंकज मराठे, नाना सोनवणे, नंदुभाऊ राजपुत, शरद पाटील, सिध्दार्थ जावळे, शुभम बोरसे, अतुल लोहार, कुंदन पाटील, राज पाटील, गणेश वाघ, रोहनराजे पाटील, गणेश पाटील, बाळु पाटील, विक्की महाजन, अतुल पाटील, अमोल देशमुख, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version