Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोहारा येथे सुलक्ष्मी सेवाभावी संस्थातर्फे रक्तदान शिबीर

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथे माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर संपन्न झाले.

 

संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबीराची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये वृंदावन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील, विकास लोहार, समाजसेवक सुमित पंडित, संतोष  सराफ, विश्वजित पाटील, निळकंठ पाटील, ईश्वर चोरडिया हे होते. समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी तब्बल २७  वेळेस रक्तदान करत तरुण पिढी समोर आदर्श ठेवला आहे. यावेळी गोपाल वाणी, निलेश देशमुख, राजेंद्र गीते, अतुल कोळी, विकास माळी, भूषण पाटील,गणेश मोरे, अरविंद पाटील, गजानन पाटील यांनी रक्तदान केले.  रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी चेतन पाटील, विकास माळी, दत्तात्रय तेली, गोपाल वाणी, रमेश लिंगायत, सुपेश वाणी, महेंद्र घोंगडे, यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक, जळगाव यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version