Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; महालक्ष्मी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हलच्या मालकाला पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । बेकायदेशीर रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या खान्देश कॉम्लेक्समधील महालक्ष्मी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल दुकानावर छापा टाकून ६ हजार ७३३ रूपयांचे तिकिटे जप्त करून मालकाला अटक केली आहे. आज न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रेल्वे तिकिट विक्री करण्याचा पनवाना नसतांना, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या रेल्वे स्टेशनरोडवरील खान्देश कॉम्प्लेक्समधील महालक्ष्मी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या दुकानावर बुधवारी रेल्वे सुरक्षा बलासह भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत पथकाने 6 हजार 733 रुपयांचे तिकिट जप्त केले असून महालक्ष्मी टूर्स अ‍ॅण्ड ट्रव्हलचे मालक संजय मोतीराम चौधरी वय 53 यांना अटक केली आहे. संशयित आरोपीला आज रेल्वेच्या न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भुसावळच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख सीनियर डीसीएम तथा आरपीएफ विभागाचे प्रमुख सीनियर डीएससी यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळच्या रेल्वे वाणिज्य विभागाचे एटीएस पथकातील मुख्य तिकिट निरिक्षक हेमंत सावकारे, मुख्य तिकिट निरिक्षक ए. एस. राजपूत, उपमुख्य तिकिट निरिक्षक प्रशांत ठाकूर व जळगावचे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक सी एस पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान कुठलाही परवाना नसतांना महालक्ष्मी टूर्स ट्रॅव्हल्सने मोठ्या बाजारावर काळा बाजार उघडकीला येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version