Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात रेशन धान्याचा काळा बाजार; अडीच लाखांचा साठा जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुध फेडरेशनजवळील राजमालती नगरात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या एका विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी नगरातील दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरातील मेहमूद बिसमिल्ला पटेल (रा.राजमालती नगर) यांच्या घरातून रेशनचा माल अवैधरित्या व परस्पर काळ्याबाजारात जात असल्याची माहिती दीपक गुप्ता यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना कळविली होती. त्यानुसार नामदेव पाटील यांनी सोमवारी ६ जून रोजी सायंकाळी पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना केले होते. या पथकाने केलेल्या चौकशी सदरचे धान्य रेशनचे असल्याचे निष्पन्न झाले, मात्र त्याच्याजवळ कोणत्याच पावत्या नव्हत्या. अखेर तहसीलदार यांच्या पथकाने २२ हजार ५०० रुपये किमतीचा १५ क्विंटल गहू व २ लाख २५ हजार किमतीचा ९० क्विंटल तांदूळ, १ हजार रुपये किमतीच्या धान्याच्या गोण्या असा एकूण २ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचा साठा व मालवाहू वाहने (एमएच ०६ एक्यू२१२४) आणि  (एमएच १९ सीवाय ६०६७) जप्त करण्यात आली आहेत. पुरवठा तपासणी अधिकारी डिगंबर भिकन जाधव (रा.रायसोनी नगर) यांच्या फिर्यादीवरुन मेहमूद पटेल यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Exit mobile version