Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे भाजपची मोटार सायकल रॅली

0795c42a 057b 41d6 bbf7 49a51050ab43

पाचोरा (प्रतिनिधी) येथे रविवारी (दि.३) दुपारी १२.०० वाजता भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका व शहर मंडलाकडून विजयी संकल्प मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. रॅली भडगाव रोडवरील महादेव मंदिर येथुन निघाली, तेव्हा आ. स्मिता वाघ यांनी झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले.

 

यावेळी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख मधु काटे, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील , शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, राज्य परिषद सदस्य डी.एम. पाटील, कृउबा सभापती सतीश शिंदे, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, माजी नगरसेवक अमोल शिंदे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, विस्तारक दीपक देशमुख, शहर सरचिटणीस नितीन पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भडगाव शहराध्यक्ष शैलेश पाटील, भडगाव तालुका सरचिटणीस अनिल पाटील या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरली. रॅलीत विविध घोषणा देवून शहर दणाणून सोडले. तसेच या रॅलीचा समारोप जारगाव येथील नाथ मंदिरात करण्यात आला.

Exit mobile version