Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाचा अंतर्गत सर्व्हे; मोदी-शहांची उडाली झोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने सत्ताधारी भाजपाने आपली ताकद किती हे जाणून घेण्यासाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेनंतर मोदी-शहांची झोप उडाली आहे. भाजपाला 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपाला 51 जागांचे नुकसान होणार आहे. भाजपला अवघ्या 20 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाची झालेली आघाडी ही भाजपाच्या जागा घटवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. उत्तर प्रदेशातल्या 14 मोठ्या शहरांतील 8 जागांवर समाजवादी पार्टी आणि 6 जागांवर बसपा निवडणूक लढवू शकते. या 14 जागांपैकी तीन जागांवर 2014च्या निवडणुकीत काँग्रेस दोन नंबरवर होती. यातील तीन जागांवर सपा विजय मिळवू शकते. तर तीन जागांवर काँग्रेस जिंकण्याची शक्यता आहे. सपा आणि बसपाने आघाडी करतानाच अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. तर इतर पक्षांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, मोर्चेबांधणी आता केली जात आहे.

Exit mobile version