Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात भाजपचा कार्यकर्ता संघटन मेळावा

पाचोरा प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संघटन  मेळावा आयोजित करण्यात आला.                                   

याप्रसंगी जळगाव लोकसभा खासदार उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार राजु भोळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर विभागीय संघटन मंत्री रवि अनाजपुरे, क्षेत्र राज्य संपर्क प्रमुख किशोर काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले की, पाचोरा – भडगाव येथील कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा पदाधिकारी यांच्यातला समन्वय पक्षाला उभारी देणारा असून भविष्यात पाचोरा तालुका भाजपचा हक्काचा मतदारसंघ  होईल.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय धांडे, जळगाव लोकसभा विस्तारक सचिन पान -पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, ज्येष्ठ नेते सतिश शिंदे, सदाशिव पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, जिल्हा व्यापारी आघाडीचे कांतीलाल संचेती आदी मान्यवरांनी संघटन बैठकीस उपस्थित होते.

 

Exit mobile version