आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावलमध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात होवू घातलेल्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा तालुका पातळीवरील मेळावा सोमवारी संपन्न होणार आहे.

सोमवार, दि.३० मे रोजी दुपारी ०१.३० वाजता यावल श्री व्यास मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात होणाऱ्या संभाव्य जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपालिकांच्या निवडणूकी संदर्भात आढावा घेण्यात येणार असून उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या  मार्गदर्शनासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, हिरालाल चौधरी, शरद महाजन, जिल्हा सरचिटणीस भाजपा हर्षल पाटील, माजी सभापती रविंद्र पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस भरत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष कांचन फालक, जिल्हा चिटणीस सविताताई भालेराव, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, गणेश नेहते,  अमोल हरिभाऊ जावळे, माजी सभापती पल्लवीताई चौधरी, सुरेश देवराम पाटील, डॉ.नरेंद्र कोल्हे, शोभाताई पाटील, यावल पंचायत समिती माजी उपसभापती दीपक पाटील, योगेश भंगाळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष पुरजित चौधरी, स्वच्छ भारत मिशन जिल्हाध्यक्ष निलेश राणे, अनुसूचित जाती जिल्हा सरचिटणीस नागेश्वर साळवे, बाजार समिती माजी उपसभापती उमेश पाटील, योगराज बऱ्हाटे, उपसभापती खरेदी – विक्री संघ यावल सुनील नेवे, माजी नगरसेवक यावल डॉ.कुंदन फेगडे, ज्येष्ठ मार्गदर्शक बी.के चौधरी यांची उपस्थिती लाभणार आहे.

तरी या मेळाव्यासाठी सर्व जिल्हा परिषद सदस्य, सभापती, प.स.सभापती, उपसभापती, सदस्य, नगरपालिका अध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सदस्य, गट प्रमुख, गण प्रमुख, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, सर्व बुथ प्रमुख, आघाडया,  महिला आघाडी, शाखाध्यक्ष यांनी सोमवार, दि ३० मे रोजी यावलचे श्री व्यास मंदिर हॉल येथे दुपारी ०१.३० वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सरचिटणीस विलास चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, महिला आघाडी अध्यक्षा विद्याताई पाटील, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, स्नेहल फिरके आदींनी केले आहे.

Protected Content