Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात संजय सावकारे ‘किंगमेकर’ : भाजपचा दणदणीत विजय

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज लागलेल्या निकालात भाजप प्रणीत पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून आमदार संजय सावकारे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मोठी चुरस पाहण्यास मिळाली. यात भारतीय जनता पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरूध्द महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलमध्ये तगडी लढत झाली. यात संजय सावकारे यांनी भाजपच्या पॅनलचे तर आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी मविआच्या पॅनलचे नेतृत्व केले. निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. काल निवडणुकीत तब्बल ९८ टक्के मतदारांनी मतदान केल्याने ही वाढीव टक्केवारी नेमकी काय निकाल लावणार याची उत्सुकता लागली होती.

दरम्यान, आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. यात शेतकरी विकास पॅनलने पहिल्यापासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. या पॅनलला तब्बल १५ जागा मिळाल्या असून विरोधकांना फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

Exit mobile version