Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात भाजपचेच सरकार येणार- राणे

मुंबई प्रतिनिधी । सत्ता स्थापनेचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर आता राज्यात भाजपचेच सरकार येणार असून आपण यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतीपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणार्‍या वर्षा या बंगल्याबाहेर पत्रकारांशी बोलतांना नारायण राणे यांनी भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले की, १४५ आमदारांचा पाठींबा घेऊनच देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांची भेट घेतील. येत्या काही दिवसांमध्ये भाजपचे सरकार सत्तारूढ होणार असून यासाठी आपण पूर्णपणे सहकार्य करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

Exit mobile version