Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरे सरकारची पोरं हुश्शार ! : भाजपने साधला निशाणा

मुंबई प्रतिनिधी । देशात सर्वाधीक कोरोना रूग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत असल्याच्या पार्श्‍वभूमिवर प्रदेश भाजपने ”ठाकरे सरकारची पोरं हुश्शार” Thakre Sarkar म्हणून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या आता धोक्याच्या टप्प्यावर असल्याचे दिसून आले आहे. विशेष करून देशातील रूग्णसंख्येत सर्वात मोठा वाटा आपल्याच राज्याचा असल्याचेही अधोरेखीत झाले आहे. याच मुद्यावरून आता महाराष्ट्र भाजपने राज्य सरकारवर टिका करणारे ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय, असं म्हणत ”ठाकरे सरकराची पोरं हुश्शार”… Thakre Sarkar असा टोला देखील लगावण्यात आला आहे.

Exit mobile version