Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाने तात्काळ माफी मागावी – सचिन सावंत

मुंबई – महाराष्ट्राला उर्मिला मातोंडकर यांचा अभिमान असून त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा जाहीर निषेध करत कंगणाच्या मुखातून वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या भाजपाने 13 कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

कंगणा व भाजपा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, कंगणा राणावतचे प्रताप आता सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहेत. उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल जी भाषा तीने वापरली ती ऐकून महाराष्ट्रातील जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. हा फक्त उर्मिला यांचा अपमान नसून समस्त मायभगिनींचा अपमान आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील उर्मिला यांनी दर्जेदार अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्राची संस्कृती व मराठीचा झेंडा सदैव उंचावत ठेवला आहे. त्यांचा अपमान हा मराठीचा व महाराष्ट्राचा अपमान आहे. या सर्व प्रकाराला भारतीय जनता पक्षही तीतकाच जबाबदार आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून वेडापीसा झालेला भाजपा महाराष्ट्राचा सूड उगवत आहे.

भारतीय जनता पक्षाने मागील सहा वर्षात मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राज्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प, कार्यालये, ही गुजरातला हलवण्यात मदत करून महाराष्ट्राचे औद्योगिक व आर्थिक महत्व कमी केले.  कंगणाच्या आडून नसते उद्योग करत बॉलिवूडला बदनाम करायचे आणि ही जागतिक दर्जाची चित्रपटसृष्टी मुंबईबाहेर न्यायची असे षडयंत्र रचले गेले आहे, असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

Exit mobile version