Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात भाजप-सेनेची बैठक

जळगाव प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे.

शहरातील हॉटेल कोझी कॉटेज येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली तरी अनेक तालुक्यांमध्ये या दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वैमनस्य आहे. यातच अनेक ठिकाणच्या शिवसैनिकांनी भाजपचे काम न करण्याची जाहीर भूमिका घेतली आहे. यामुळे निवडणुकीत समन्वय राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मंथन सुरू केले आहे. यातील तपशील अद्याप समोर आला नसला तरी बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीला जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार राजूमामा भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेने जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, रिपाइंचे रमेश मकासरे, आनंद खरात आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version