Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आसाममध्ये भाजपची एजीपी व यूपीपीएल सोबत आघाडी

नवी दिल्ली । आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने एजीपी आणि यूपीपीएल सोबत आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून पक्ष ९२ जागांवर उमेदवार देणार आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, बीएल संतोष, राजनाथ सिंह, कैलाश विजयवर्गीय, थावरचंद गहलोत, शाहनवाज हुसेन, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.

यात आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि सहयोगी पक्ष आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल्स (यूपीपीएल) यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे. यानुसार, एजीपी विधानसभेच्या २६ जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. तर यूपीपीओ ८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर, उर्वरित ९२ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

आसाम विधानसभेच्या १२६ जागा आहेत. राज्यात २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी ७२ मार्चला, तर दुसर्‍या टप्प्यात ३९ जागांसाठी १ एप्रिलला आणि तिसर्या आणि शेवटच्या टप्प्यात ४० जागांसाठी ६ एप्रिलला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ मार्च आहे.

Exit mobile version