Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरणच्या नवीन वीज मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला भाजपाचा विरोध

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथे गत दोन दिवसांपासून महावितरण च्या माध्यमातून नागरिकांची वीज मीटर काढून विद्युत खांबांवर बसविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्युत मीटर बसविण्या साठी पेट्यांचा वापर करण्यात येत आहे. त्या पेट्या विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या आहेत. या पेट्यांमुळे अनेक व्यावसायिकांचे दुकानात येण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण होत आहे. सदरच्या पेट्या विद्युत खांबाच्या बाहेर आलेल्या असून त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावलेली आहे.

यासंदर्भात अनेक नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यासंदर्भात गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र चौधरी यांचे नेतृत्वात महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे सदरचे वीज मीटर लावण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात इतर कुठेही सुरू नसताना फक्त सावदा शहरात ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून ती अन्यायकारक असल्याने वीज मीटर लावण्याच्या या प्रक्रियेला त्वरित स्थगिती देण्यात यावी. अन्यथा याप्रकरणी लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करण्याचा इशारा भाजपातर्फे देण्यात आला.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष जे. के. भारंबे, बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सौ सारिका चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख मनीष भंगाळे, अक्षय सरोदे, सचिन बऱ्हाटे, सागर पाटील, मुरली चौधरी, कृष्णा पाटील, संजय बंनापुरे, युवराज नेमाडे, विनोद नेमाडे, भारत चव्हाण, ललित महाजन, चंदन पाटील, निलेश अच्युत, सुधीर भंगाळे, ललित चौधरी, प्रितेश सरोदे, ईश्वर नेमाडे, भाजपा सरचिटणीस संतोष परदेशी व महेश अकोले यांच्यासह भाजपा सेना युतीचे अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version