Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दादरा आणि नगर हवेलीमधून भाजपने दिली ठाकरे गटाच्या खासदाराला उमेदवारी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ७२ जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे आहेत. या यादीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांचे नाव आहे. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

हे खासदार दादरा आणि नगर हवेलीमधून कलाबेन डेलकर आहे. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर भाजपने महेश गावित यांना पोटनिवडणूकीत उमेदवारी दिली होती, तर शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबने डेलकर यांना उमेदवारी दिली होती आणि त्या पोटनिवडणूकीत कलाबेन डेलकर सहानुभूतीच्या लाटेवर दादरा आणि नगर हवेलीमधून विजयी झाल्या होत्या.

दादरा नगर हवेलीमधून मोहन डेलकर हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले होते, त्यांचा २२ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचा दक्षिण मुंबईत एका हॉटेलमध्ये निधन झाले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांना दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने हा मुद्दा लावून धरला होता. मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे प्रकरण तापले होते. पण त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत कलाबेन डेलकर विजयी झाल्या होत्या आणि ते प्रकरण शांत झालं.

Exit mobile version