Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचे गावागावात तरुणांकडून स्वागत

Mangesh chaivhan news

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी विकासाचा ध्यास घेतला असल्याचा प्रत्यय आजच्या दौऱ्यातून दिसून आला. यावेळी गावागावात तरूणांकडून स्वागत करण्यात आले. खा.उन्मेष पाटील व जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल मंदिरापासून प्रचार दौरा सुरू केला.

गावागावात स्वागत
भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांचे प्रत्येक गावातून तरुणांकडून यांचे स्वागत केले जात आहे. गायरान बु. खु., दसेगाव, मेहुणबारे, तिरपोळे, वरखेडे बुद्रुक, दरेगाव (पिंपळवाडी) दरा तांडा, कृष्णापुरी, विसापूर, रामनगर, लोंढे, पळासरे, चिंचगव्हाण, दहिवद, खडकिसिम, धामणगाव, भवुर, शिद वाडी, जामदा, भवाळी आदी गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला.

यांनी नोंदविला सहभाग
मंगेश चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा कमळ फुलविण्यासाठी चा जयघोष गावागावात, घराघरात करण्यात आला. मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी शहरातील प्रभाग क्र.9 व 10 मध्ये जोरदार प्रचार करत शहरात प्रचाराची आघाडी घेतली. त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, तालुकाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, जि.प.सभापती पोपट भोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य धर्मराज वाघ, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंदात्रे बाबा, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, किसान आघाडी प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, जेष्ठ नेते राजेंद्र अण्णा चौधरी, पं.स.सभापती दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, मार्केट सभापती रविंद्र पाटील, संचालक सरदारशेठ राजपूत, ॲड.राजेंद्र सोनवणे, अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील, पं.स. सदस्य पियूष साळुंखे, गटनेते संजू राजपूत, तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, भाजपा प्रदेशसदस्य यु.डी.माळी, जि.प.सदस्या मोहिनी गायकवाड, पं.स. सदस्य बापू पाटील,पं.स. सदस्या सुनंदा साळुंखे, तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र अमृतकार, मार्केट कमिटी संचालक सरदारशेठ राजपूत, गटप्रमुख भैय्यादादा वाघ, गणप्रमुख सुनील पवार, गणप्रमुख विनोद (भोला) पाटील, तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रज्ञावंत आघाडीचे रमेश सोनवणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अक्षय मराठे, किशोर पाटील ढोमनेकर, दिनकर राठोड, व सर्व आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य सरपंच उपसरपंच सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version