Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कल्याण येथील भाजप आमदार नरेंद्र पवार यांचा राजीनामा

narendra pawar

ठाणे (वृत्तसंस्था) आपल्या भूमिकेमुळे पक्षाला त्रास होऊ नये, म्हणून कल्याण पश्चिमेतील बंडखोर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची पोस्ट फेसबुक पेजवर टाकली आहे.

 

आपल्या फेसबुक पेजवर आमदार पवार यांनी म्हटले आहे की, माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी राजीनामा दिल्याने मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल, मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो? मलाही कल्पना नाही. २०१४ साली युती नसताना भाजपच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि मी जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केले, असे असताना मला उमेदावारी नाकारण्यात आली, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

Exit mobile version