Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजप नेत्या डॉ. अस्मिता पाटील यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश

जळगाव प्रतिनिधी | भाजप नेत्या डॉ. अस्मीता पाटील या पक्षाला ‘जय श्रीराम’ करून उद्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत.

डॉ. अस्मीता पाटील या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असल्याची माहिती समोर आली होती. मध्यंतरी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून उद्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

डॉ. अस्मीता पाटील यांनी शिवसेनेतील प्रवेशाला लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दुजोरा दिला आहे. आपली पुढील वाटचाल ही भगवा झेंडा हातात घेऊन असेल. शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार आपण वाटचाल करणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. डॉ. अस्मीता पाटील यांच्या माध्यमातून भाजपला जिल्ह्यात पुन्हा एकदा हादरा बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version