Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे बाबासाहेबांचा अवमान केल्याच्या निषेर्धात जितेंद्र आव्हाडाच्या प्रतिमेवर भाजपचे जोडे मारो आंदोलन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चवदार तळ्यावर जाऊन परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना उद्धाराचा नवीन मार्ग दाखवून दिला, त्याच पवित्र ठिकाणी आज त्यांचा फोटो फाडण्याचे दुष्कृत्य करून आपली विकृत मानसिकता दाखवून देणार्‍या जितेंद्र आव्हाड याचा पारोळा शहरात भारतीय जनता पार्टी वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी अतुल मोरे, रविंद्र पाटील, मुकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, धिरज महाजन, नरेंद्र राजपूत, जितेंद्र चौधरी, नरेंद्र साळी, समीर वैद्यसंकेत दाणेज, विनोद हिंदूजा, कैलास चौधरी, अशोक चौधरी, किरण चौधरी, युवराज पाटील, लक्ष्मण महाले, मनोज चौधरी, श्रीराम भोई, संतोष महाजन, पिंटू बारी, राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी, अजय खाडे मुन्ना निकम, भावेश पाटील, आर.पी.आयचे ईश्वर वाडिले ,भगवान सोनवणे, अशोक कापडणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच हा देशाचा व संविधानाचा देखील अवमान आहे. त्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आमची केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की या विकृत जितुद्दीनवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला तात्काळ अटक करावी! अन्यथा आंबेडकरी जनता त्याला सोडणार नाही!

Exit mobile version