Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपने त्यांच्यातील ओबीसी नेत्यांना नेहमी डावलले – रा.काँ युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी पक्षाने ओबीसींना आरक्षण मिळू नये, यासाठी मंडल आयोगाच्या शिफारशीला विरोध केला. त्यांच्या पक्षातील ओबीसी नेत्यांना डावलून त्याचे काय हाल केले हे सर्वांना माहित आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी दिली. यावल येथील शरद युवा यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही ओबीसी नेत्यांच्या अथक परिश्रमातून पक्ष वाढविला आहे. आज याच पक्षाने त्यांची काय अवस्था केली ते सर्व जनतेला माहिती आहे. यात माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, स्व. गोपीनाथ मुंडे, चंद्रशेख बावनकुडे किंवा पंकजा मुंडे असो यांची पक्षात आज परिस्थिती काय आहे. हे बघुन खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचा शत्रु कोण आहे हे कळेल. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख दिला.

केन्द्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या कार्यकाळात गगनाला भिडलेली महागाई, ईडीच्या नावाखाली होत असलेले अनेकांचे शोषण, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यातील काँग्रेसचे बहुमत असतांना भाजपाने सत्तेचा मोठा दुरुपयोग करून आर्थिक बळावर केलेले सत्ता परिवर्तन या विषयावर भाजपाच्या कारभाराचे चौफेर फटकेबाजी करीत खरपुस समाचार घेतले .

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादीचे फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, यावल शहराचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, युवकचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे , फैजपुर युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी मोठया संख्येत या कार्यक्रमास उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्तावना युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील यांनी मांडली सुत्रसंचालन भरत चौधरी यांनी केले .

 

Exit mobile version