Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा गटनेते भगत बालाणी अपघातातून बचावले

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे महापालिकेतील गटनेते भगत बालाणी यांच्या कारला सोनगड ते व्याराच्या दरम्यान अपघात झाला असून यात एयरबॅग्जमुळे सुदैवाने त्यांच्यासह कारमधील सर्व जण बचावले आहेत.

भाजपचे महापालिकेतील गटनेते भगत बालाणी हे आपली कन्या व नातींना अहमदाबाद येथे सोडण्यासाठी जात होते. दुपारी सोनगड ते व्याराच्या दरम्यान त्यांच्या कारने अचानक दोन पलट्या घेतली. यात वेळीस एयरबॅग्ज उघडल्यामुळे कुणाला दुखापत झाली नाही. या कारमध्ये भगत बालाणी यांच्यासह सुरेश मंधान, बालाणी यांची कन्या आणि दोन मुली असे एकूण पाच जण होते. या सर्व जणांना किरकोळ जखमा वगळता काहीही दुखापत झाली नाही.

Exit mobile version