Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ येथे भाजपातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते शहरातील महात्मा गांधी पुतळ्यास व संपर्क कार्यालयात लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, माजी नगरसेविका दिपाली बऱ्हाटे, माजी नगरसेवक पिंटू ठाकूर, निक्की बत्रा, गिरीश महाजन, अजय नागरानी, सतिश सपकाळे, राजु खरारे, विशाल जंगले, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, प्रा.विलास अवचार, संजय बोचरे, सागर चौधरी, गोपिसिंह राजपुत, भारत उमरिया, विक्की गोहर, सागर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version