Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार गायकवाड यांच्या माफिनाम्याची भाजप अध्यात्मिक आघाडीची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । बुलढाणा  जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू धर्माबद्दल व कीर्तनकारांबद्दल अपशब्द काढले आहेत. याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन त्यांना त्वरित  निलंबित करावे व महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागवी अशी मागणी  भाजपा अध्यात्मिक  आघाडी प्रमुख हेमंत जोशी यांनी केली. 

हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,विदर्भातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये चुकीच्या पद्धतीने भाषा वापरली आहे. कीर्तनकारांनी त्यांना याचा जाब विचारला असता त्यांनी कीर्तनकारांना देखील गलिच्छ शिव्या दिल्यात. आजचे त्यांचे वक्तव्य आहे की, जर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला तर मी हक्क भंग आणेल. हक्क भंग हा विधान भवनात येतो पोलीस स्टेशनमध्ये येत नाही हे आमदाराला कळत नाही हि अतिशय हास्यास्पद घटना आहे. अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र, तो झाला नाही. शिवसेनेचे मुख्य सचिव विनायक राऊत यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला असता त्यांनी आमदारांना कीर्तनकारांची माफी मागायला सांगतो असे स्पष्ट केले.मात्र, आमदारांची माफी मागण्याची कोणतीही भाषा नसल्याने हा संपूर्ण वारकऱ्यांचा अपमान असल्याने सोमवारी प्रत्येक प्रांत व तहसीलदार यांना प्रातिनिधिक स्वरुपात  निवेदन देऊन  आमच्या भावना कळवू असे त्यांनी सांगितले.

आमदाराचे निलंबन होत नसेल तर कोरोना लॉकडाऊनचा कालखंड संपल्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन करू.  ज्याच्यात हिमत असेल त्याने चर्चेला यावे असे आवाहन आमदार गायकवाड यांनी केले आहे. उलट त्यांच्यात हिमत असेल  तर त्यांनी मिडीया समोर बसावे आम्ही त्यांना अध्यात्मिक व सामाजिक ज्ञान किती हे पाहू.  आमदार गायकवाड यांचे  निलंबन झाले नाही तर आगामी महिन्यात हिंदू बांधव व वारकरी संप्रदायाच्या वतीने  एक लाख पत्र यांच्या निलंबनासाठी वर्षा व मातोश्री बंगल्यावर पाठवणार आहोत , असेही यावेळी सांगण्यात आले . या पत्रकार परिषदेला भाजपा अध्यात्मिक  आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर महाराज, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version