पोटनिवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री धामी विजयी

नवी दिल्ली/देहरादून, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिह धामी यांनी चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचे कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार निर्मला गेह्तोडी यांचा पराभव केला असून ५५ हजारांहून अधिक बहुमत मिळवीत विजय प्राप्त केला आहे.
गेल्या तीन चार महिन्यापूर्वी झालेल्या उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवीत सत्ता स्थापन केली होती. परंतु उत्तराखंड चे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे त्यांच्या मतदार संघातून पराभूत झाले होते. तरी त्यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यानुसार चंपावत मतदार संघाचे आमदार गह्तोडी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्यासाठी राजीनामा देत त्यांचा मतदारसंघ धामी यांना दिला होता. चंपावत मतदार संघात ३१ मे रोजी विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते, चंपावत मतदार संघातून मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी झालेल्या पोटनिवडणुकीत ५८ हजार २५८ मते मिळवीत विजय प्राप्त केला. काँग्रेस उमेदवार निर्मला गह्तोडी यांना केवळ ३२३३ मते मिळाल्याने त्या पराभूत झाल्या.

Protected Content