Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धार्मिक स्थळे उघडल्याने भाजपातर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळानंतर राज्य शासनाने नवरात्रोत्सवात  राज्यातील सर्व देवस्थान मंदीरे उघडण्यास परवानगी मिळाल्याने आज गुरूवार ७ ऑक्टोबर रोजी गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदीराजवळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करून पेढे वाटून करण्यात आले.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने देशात कहर माजविला होता. त्यामुळे कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला. दरम्यान देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यात देशातील सर्व धार्मीक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. सध्या देशासह राज्यात कोरोना रूग्ण संख्या नगन्य असल्याने शाळा, महाविद्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणे घडण्यास परवानगी देण्यात आली. परंतू धार्मिक स्थळे उघडण्यास मनाई केलेली होती. सध्या जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या अगदी नगन्य असल्यामुळे राज्य शासनाने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मीक स्थळे व मंदीरे उघडण्यास परवानगी देण्यात आली. यासाठी भारतीय जनता पार्टी आणि वारकरी मंडळींनी वेळोवेळी आंदोलने केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर आज भाजपातर्फे शहरातील गोलाणी मार्केट जवळील हनुमान मंदीरासमोर आनंदोत्सव साजरा करून नगरीकांना पेढे वाटप केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, स्वप्निल पाटील, मनोज भांडारकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version