Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधानपरिषदेतील विजयाचा जामनेरात जल्लोष

जामनेर प्रतिनिधी | राज्यामध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सहापैकी भारतीय जनता पार्टीच्या चार उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला असून जामनेर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील नगरपालिका चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, आनंदा लावरे, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, नाना वाणी, शेख अनिस, सुहास पाटील, कैलास पालवे, वैभव पाटील, सुभाष पवार, विकास वंजारी, निलेश चव्हाण, विजय शिरसाठ, दिपक तायडे, सागर चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नागपूर मतदार संघातून चंद्रशेखर बावनकुळे, धुळे नंदुरबार मतदार संघातून अमरीशभाई पटेल, अकोला बुलढाणा वाशीम मतदार संघातून वसंत खंडेलवाल आणि मुंबई मतदारसंघातून राज हससिंग हे चार उमेदवार भरघोस मतांनी मतांनी निवडून आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला

Exit mobile version