Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, फडणवीस यांचा समावेश

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून सर्व पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर होत आहेत. आज भाजपाने आपल्या 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

भाजपा स्टार प्रचारकाच्या यादीत चौथे नाव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आहे. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर डाॅ. संजय जैस्वाल आणि सुशील मोदी यांचे नाव आहे. या यादीत भूपेंद्र यादव यांना सातव्या नंबरवर जागा मिळाली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.

राधा मोहन स्वामी आणि रवि शंकर प्रसाद यांचे नाव नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे. याच क्रमानूसार गिरिराज सिंग, स्मृती इरानी, अश्विनी कुमार चौबे, नित्यानंद राय, आरके सिंग, धर्मेंद्र प्रदान, योगी आदित्यनाथ, मंगल पांडे, राम कृपाल यादव,  सुशील सिंग, छेदी पासवान, संजय पासवान, जनक छामर, सम्राट चौधरी,  विवेक ठाकुर आणि शेवटी निवेदिता सिंग यांचे नाव यादीत समावीष्ट आहे.

Exit mobile version