क्रॉस व्होटिंग केल्याने बिश्नोईंना फटका; काँग्रेसने दाखवला बाहेरचा रस्ता

दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | काल संपन्न झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हरियाणा काँग्रेसने आमदार कुलदीप बिश्नोई यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

याविषयी अधिक वृत्त असे की, “राज्यसभा निवडणुकीत आमदार कुलदीप बिश्नोई यांनी क्रॉस व्होटिंग केले. त्याचा त्यांना फटका बसला असून काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यासह पक्षाच्या सर्व विद्यमान पदांवरून त्यांना काढण्यात आले आहे.

राज्यसभा निवडणुकीत हरियाणातून काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट करत, ‘सापाचा फणा चिरडण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे, सापांच्या भीतीने जंगल सोडू नका. गुड मॉर्निंग.’ असे म्हटले आहे.

काँग्रेसकडून बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी हरियाणा विधानसभा अध्यक्षांनाही शिफारस केली जाऊ शकते.

Protected Content