Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिलखेडा येथील शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बिलखेडा येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी समोर आली आहे.  त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

अधिक माहिती अशी की, माधवराव श्रावण कुंभार (वय-६२)  हे शेती करुन उदरनिर्वाह भागवित होते. मंगळवारी घरीच एकटे होते. तर पत्नी शेतात गेलेली होती व मुले कामावर गेले होते. यादरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास माधवराव कुंभार यांनी राहत्या घरात गळफास घेतला. गावातील नागरिकांमुळे घटना समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील मुकूंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. एमआयडीसी पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली. त्यानुसार सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मयत माधवराव कुंभार यांच्या पश्‍चात पत्नी कमलबाई , दोन मुले मुकूंदा व दुर्गेश तसेच मुलगी जयश्री असा परिवार आहे.

Exit mobile version