Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगरात मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी गुरुवारी मालवाहू वाहनावरील चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील गणेशवाडी येथे किशोर आनंदा पाटील वय ५२ हे वास्तव्यास आहेत. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. बुधवार, १२ जुलै रोजी किशोर पाटील हे नेहमीप्रमाणे कामावर ट्रान्सपोर्ट नगरात आले होते. यादरम्यान किशोर पाटील हे काम आटोपून पुन्हा ट्रान्सपोर्ट नगरातून घराकडे जात असतांना एम.एच. ०४ जीएफ २६५२ या क्रमाकांच्या मालवाहू वाहनाने किशोर पाटील यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, या धडकेत, दुचाकीस्वार किशोर पाटील हे दुचाकीवरुन खाली जमीनीवर पडले, व त्यांच्या छातीला व बरगड्याला मार लागला. या अपघातप्रकरणी किशोर पाटील यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एम.एच. ०४ जीएफ २६५२ या क्रमांकांच्या मालवाहू वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार हे करीत आहेत.

Exit mobile version