Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोदावरी इंजिनिअरींग कॉलेज जवळील महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या वाहणाच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याप्रकरणी सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता चारचाकी वाहनचालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक अशोक पथरोड रा. आयटीआय समोर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्ग एमआयडीसी परिसरात असलेल्या अजित टायर जवळून अभिषेक पथरोड हा तरूण शहरात रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास (एमएच ३० बीएन ४४६२) या दुचाकीने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षा (एमएच १९ सीवाय ७९०३) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अभिषेक पथरोड हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे. याप्रकरणी रिक्षा चालक समीर खान सांडू खान रा. उमर मज्जीदजवळ, मास्टर कॉलनी, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Exit mobile version