Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे उड्डाणपुलावरील भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हि घटना मंगळवारी २६ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. निलेश गणेश सावंदे (वय-३१, रा. चिंचोली ता. यावल ह.मु. तुरखेडा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश सावंदे हा तरुण जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथे कामाच्या निमित्ताने वास्तव्याला आहे वीट भट्टीवर मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवारी २५ रोजी तो चिंचोली येथे घरी गेला होता. तेथून तुरखेडा येथे मित्र प्रदीप भगवान पंडित (वय २९) यांच्यासह परतत होता. मध्यरात्री १ वाजता नशिराबाद उड्डाणपुलाजवळ आले असतानां त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.

नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता निलेश सावंदे याला वैद्यकीय पथकाने तपासून मृत घोषित केले. तर प्रदीप पंडित याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरण नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version