Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार

भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीने घरी जात असताना समोर कुत्रा आडवा आला त्यात दुचाकीवर ताबा सुटल्याने दुचाकी उभ्या उसाच्या गाडीला धडक दिल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वराचा मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत काशिनाथ माळी महाजन (वय-५२) रा. गुढे ता.भडगाव असे महेश झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरत माळी हे आपल्या परिवारासह भडगाव तालुक्यातील गुढे येथे वास्तव्याला होते. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएक्स ७३७६) याने कामावरून घरी जात असताना गुढे गावाजवळ नामदेव मोरे यांच्या शेतासमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्याला घाबरून त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि थेट ऊस वाहतूक करणाऱ्या लोखंडी गाडीला धडक दिली. या धडकेत त्यांच्या मांडीला डोक्याला मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत अखेर शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे करीत आहे.

Exit mobile version