Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावातील चौकात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजता कारवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रविंद्र निनाजी वानखेडे (वय-५७) रा. शिवधाम मंदीराजवळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रविंद्र वानखेडे हे दुचाकी (एमएच १९ अीआर १३५४) ने मलकापूर येथून जळगाव ला येत असतांना भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावाजवळील चौकातून जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ०४८३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रविंद्र वानखेडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा घेतल्या नंतर शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार कारवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

Exit mobile version