Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सुंदर नगरात अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अज्ञात कारचालकावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नामदेव हरीदास राठोड वय ३८ रा. पंढरपूर नगर,भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ते भूसावळ शहरातील सुंदर नगरातून त्यांच्या दुचाकीने जात होता. त्यावेळी त्याच्या मागून येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७९२०) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नामेदव राठोड हा तरूण जखमी झाला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खाासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर नामदेव राठोड यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता कारवरील अज्ञात चालकाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश चौधरी हे करीत आहे.

Exit mobile version