Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एस.के.ऑईल मील जवळ पुढे जाणाऱ्या दुचाकीला मागून दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अशोक मेघराज सारस्वत (वय-५४) रा. महाविर नगर, जळगाव हे आचारीचे काम करून उदरनिर्वाह करतात. रविवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एस.के.ऑईल मील जवळून त्यांच्या दुचाकीने जात असतांना मागून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईडी ७८५५) वरील अज्ञात चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत अशोक सारस्वत हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री ८ वाजता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे करीत आहे.

Exit mobile version