Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात दुचाकीस्वार जखमी; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील महाबळ परिरातील नवजीवन सुपर शॉप समोर दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, निलेश सुकलाल करोसिया (वय-४३) रा. वास्तू नगर जवळ, पठाण बाबा दर्गासमोर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. निलेश करोसिया हे त्यांच्या दुचाकीने महाबळ परिसरातील नवजीवन सुपरशॉप जवळून जात असतांना समोरून दुचाकी (एमएच १९ बीपी १४५८) ने जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश करोसिया हे जखमी झाले. याप्रकरणी रविवारी २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पाटील करीत आहे.

 

Exit mobile version