Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदे गटाच्या मेळाव्यात बिहारमधील लोक : कुठे चालले तेच सांगता येईना !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी चक्क बिहारमधून लोक आणले असून त्यांना आज प्रसारमाध्यमांनी प्रश्‍न विचारले असता कुठे जाणार याची माहिती देखील देता आली नसल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात कुणाच्या सभेला किती गर्दी जमणार ? यावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यामुळे गर्दी दिसण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार ताकद लावण्यात येत आहे. यात एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावर परप्रांतीय लोकदेखील मोठ्या संख्येने दिसून आले आहेत. यातील काही जणांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांना आपण नेमके कुठे चाललोत हे सांगता आले नाही.

यातील बहुतांश जण हे बिहारमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही जणांनी आपल्याला कंपनीने मुंबईला पाठविले असल्याचे सांगितले तर काही जणांना आपण नेमके कुठे आणि कशासाठी जातोय हे देखील सांगता आले नाही. यामुळे ही सर्व मंडळी भाड्याने तर आणली नाहीत ना ? हा प्रश्‍न आता विचारला जात आहे.

Exit mobile version