Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी ! सुरक्षा कवच भेदून तरूण संसदेत शिरले

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | संसद भवनाच्या बाहेर असलेले सुरक्षा कवच भेदून दोन तरूणांनी संसदेत प्रवेश मिळवत गॅलरीतून थेट सभागृहात उड्या घेतल्याची धक्कादायक घटना आज घडल्याने एकच गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे.

लोकसभेत आज १३ डिसेंबर रोजी एक मोठी घटना घडली. दोन व्यक्तींनी सभागृहाच्या कामकाजात प्रवेश केला. या दोन्ही व्यक्तींनी व्हिजिटर गॅलरीतून लोकसभेत उडी घेतली होती. सध्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे सभागृहात गोंधळ उडाला असून सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे.

२००१ मध्ये या दिवशी संसदेवर हल्ला झाला होता१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. महिला आरक्षण विधेयकावरून झालेल्या गदारोळानंतर संसदेचे कामकाज ११.०२ वाजता तहकूब करण्यात आले. यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेतून बाहेर पडल्या होत्या.

कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना दोन जण आत शिरल्याने सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली. या तिघांना पकडण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. या निमित्ताने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version