Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : रशियाकडून युद्धबंदीची घोषणा

किव्ह – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे.

युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये वाटाघाटींसाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. यानंतरही तोडगा निघाला नसल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता रशियाच्या बाजूने यासंदर्भात मोठा निर्णय आला आहे. रशियाच्या सरकारने तात्पुरता सिजफायर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केलायं. यामुळे नागरिकांना मारियुपोल आणि व्होल्नोवाखा सोडण्याची परवानगी देण्याचीही मागणी झाली आहे.

यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती जैसे थे अशी राहिल. रशियन सैन्य माघारी घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय़ आलेला नाही. मात्र, सध्या तात्काळ सिजफायर करण्याचा निर्णय़ रशियाने जाहीर केलाय. नागरिकांचे होणारे हाल पाहता रशियाने निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय.

Exit mobile version