Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : कांदा व्यापारी आजपासून संपावर ; बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  विविध व प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने संप करण्याच्या निर्णय आजपासून घेतला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांद्याचा लिलाव बंद होता तर नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समिती व उपबाजार समिती कडकडीत बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

कांदा व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक केली. पण या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समितीमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा विक्रीसाठी न आल्याने कांदा उत्पादकांची कोंडी होणार झाली आहे. या बंद दरम्यान दररोज अंदाजे ३० ते ४० कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. तर एकीकडे अल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट असताना दुसरीकडे ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्याने कांदा महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे एक टक्का बाजार फी, अर्धा टक्का करावी संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी या शेतकरी हिताच्या मागण्या मान्य मान्य होत नाही तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी न होण्याचा कांदा व्यापारीचा निर्णय बाजार समितीने आकारलेल्या मार्केट फिचा दर प्रति शेकडा १००  रुपयास १रुपया याऐवजी १०० रुपयास ५० पैसे या दराने करण्यात यावा आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच 4% दराने अडतीची वसुली विक्रेत्यांकडून करण्याची पद्धत करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

Exit mobile version