Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर तीन महिन्यानंतर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेची तोफ धडाडणार असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे गेल्या तीन महिन्यांपासून कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत होते. यापुर्वी संजय राऊत यांनी अनेक वेळा जामीनासाठी अर्ज केले होते. परंतू प्रत्येकवेळी त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर करण्यात येत होता. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात संजय राऊत यांच्या जामीनावर कामकाज झाले असता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावनी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. च्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

Exit mobile version