ब्रेकींग : एस.टी. महामंडळाचे विलीनीकरण नाहीच !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीपासून गेल्या अनेक महिन्यांपासून संपावर असणार्‍या कर्मचार्‍यांच्या पदरी निराशा पडली आहे. महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारल्याने आता एसटीचे कर्मचारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज एसटी विलीनीकरणाच्या अहवालाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात आला होता. अहवाल सभागृहात ठेवल्यानंतर आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. शुक्रवारी या अहवाल संदर्भात राज्य सरकारच्या वतीने सभागृहात निवेदन करणार आहे.

परिवहन मंत्री अनिल परब  यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न मार्गी लावू, असं परब यांनी सभागृहात बोलताना सांगितलं. मात्र, त्यानंतर आता एसटीच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण शक्य नसल्याचं समोर आलं आहे.

 

Protected Content